मेर्वी-गुरववाडी येथे घरफोडी; ४५ हजारांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:- तालुक्यातील मेवीं-गुरववाडी येथील बंद घराचा दरवाजा चोरट्याने उचकटून ४५ हजार ९०० रुपयांचा ऐवज पळविला. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ८) सायंकाळी साडेसहा ते रविवारी (ता. ९) सकाळी साडेसात या कालवधीत निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी वामन सुतार यांच्या बंद घराचा दर्शनी दरवाजाचे कुलूप चोरट्याने धारदार – हत्याराने कापून घरात प्रवेश केला. घराच्या बेडरुममध्ये असलेल्या कपाटाच्या चाव्यांच्या साह्याने लोखंडी कपाट व लाकडी कपाट, कपाटातील लॉकर उघडून चांदीची समया, रोख रक्कम असा ४५ हजार ९०० रुपयांचा ऐवज पळविला. या प्रकरणी वामन सुतार यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पूर्णगड पोलिस अमंलदार करत आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून काहीतरी धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.