जयस्तंभ येथे विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांची धाड

२ हजार ६३५ रुपयांची मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

रत्नागिरी:-  शहरातील जयस्तंभ ते घुडेवठार जाणाऱ्या रस्त्यावरिल पत्र्याच्या शेडमध्ये मटका-जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह २ हजार ६३५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव संतोष शिंदे (वय ३२) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता.६) दुपारी पावणेचारच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयस्तंभ ते घुडे वठार जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना मटका-जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयितांकडून साहित्यासह २ हजार ६३५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.