वृद्ध महिलेसह नातवाला मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- पुरफाटा (ता. संगमेश्वर) येथे जमिन जागेच्या वादातून वृद्ध महिलेला व फिर्यांदी यांना घरात घुसून तिघांनी मारहाण केली. देवरुख पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल राठोड, निलम राठोड, संतोष राठोड (रा. पुरफाटा, ता. संगमेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. ४) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुरफाटा येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी साहिल रमेश रसाळ (वय २२, रा. पुरफाटा, संगमेश्वर) यांचे व संशयिताचे जमिन जागेचे वाद आहेत. या रागातून संशयितांनी फिर्यादी यांच्या आजीला घरात घुसून मारहाण करत होते. फिर्यादी साहिल रसाळ हे तेथे गेले असता संशयित राहुल राठोड यांने त्यांच्या डोक्यात रॉड मारला तर निलम राठोड यांनी दांडक्याने पाठीवर व डाव्या खांद्यावर मारहाण केली. तर संशयित संतोष राठोड याने कानाखाली मारुन दुखापत केली. या मारहाणीत साहिल व पुष्पा शंकर रसाळ दोघे जखमी झाले. या प्रकरणी साहिल रसाळ यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरुख पोलिस अमंलदार करत आहेत.