जालगाव येथील प्रौढाची ऑनलाईन फसवणूक

दापोली:- दापोली शहरालगत असलेल्या जालगाव येथील एका प्रौढाला ऑनलाईन फसवणूक केल्या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी १२.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांचे मोबाईलवर अज्ञात नंबरवरून फोन आला. फिर्यादी यांना प्राप्त झालेल्या क्रेडीट कार्डाबाबत व्हेरिफिकेशन करावयाचे आहे असे सांगून फिर्यादी यांचे क्रेटीट कार्डवरील १६ अंकी नंबर, सी. व्ही. सी. नंबर व एक्सपायरी तारीख याबाबत फिर्यादी यांनी त्या फोनवरील व्यक्तीला काहीही माहिती न देता सदर व्यक्तीने सांगितलेले सर्व माहिती बरोबर आहे का ते तपासून, ती माहिती बरोबर असल्याचे त्यास सांगितले. त्यानंतर त्या फोन वरील व्यक्तीने पाठवलेल्या ६ अंकी व्हेरिफिकेशन नंबर सेव्ह करून ठेवला होता. त्यानंतर ३० एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता फिर्यादी हे एच. डी. एफ. सी. बँक शाखा दापोली येथे गेले असता तेथील बँक ऑफिसरला फिर्यादी यांनी सांगितले की, मला जो व्हेरिफिकेशन नंबर बँकेकडून पाठविला आहे तो नंबर पाहून आपण मला पिन नंबर बदली करण्यास मार्गदर्शन करावे. त्याबाबत बँक ऑफिर यांनी बँकेचे लॅपटॉपवर फिर्यादी यांचे नावासहित क्रेडीट कार्डची माहिती भरली असता फिर्यादी यांचे क्रेडीट कार्ड वरून ९५,०४४.६२ रूपये इतकी रक्कम २९ एप्रिल रोजी दुपारी १.८ वाजताचे दरम्याने ‘नो ब्रोकर’ मध्ये गेले असल्याचे सांगितले म्हणून गुन्हा दाखल केला.