‘आर्जू टेकसोल’च्या म्होरक्याने रचला पद्धतशीर प्लॅन

अनेकांच्या नावाने सिमकार्ड; डिपॉझिटची रक्कम गोळा करण्याची जबाबदारी अनेकांवर

रत्नागिरी:- ‘आर्जू टेकसोल’ कंपनीचा मास्टरमाइर्ड अनी जाधव यांने कंपनी स्थापनेपूर्वीच स्वत:ला वाचविण्यासाठी कंपनीच्या कागदोपत्री व्यावहारापासून तो दुर राहिला होता. मात्र फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाच तर आपले लोकेशन पोलीसांना मिळू नये यासाठी त्याने दुसर्याच्या नावे अनेक मोबाईल सिमकार्ड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलीसांनाही अवघड होत आहे. मास्टरमाइर्ड असलेल्या अनी जाधव यांने संचालकांऐवजी अन्य काही व्यक्तींवरही डिपॉझिटची रक्कम गोळा करण्याचे काम दिल्याचेही सांगण्यात येत आहे.

‘आर्जू टेकसोल’ ने गुंतवणुकदारांना विविध आमिष देत स्वयंरोजगाराचे गाजर दाखवत ही कोट्यवधीच गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले आहे. कंपनीच्या विरोधातील तक्रारींचा ओघ वाढत असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांनी कर्ज काढुन, दागिने गहाण ठेऊन आर्जूमध्ये गुंतवणुक केली आहे. गुंतवणुक करणार्यांना हळूहळू परतावाही मिळत होता. परंतु कंपनी संशयाच्या भोवर्यात आली आणि अनेकांची देणी थकली त्यामुळे कंपनीविरुद्ध गुंतवणुदारांनी तक्रार केली. त्यावरून गुन्हा दाखल करत दोन संचालकांना अटक केली. तर अनी जाधवसह त्याचा सहकरी सावंत अध्याप पोलीसांना साडलेले नाहीत.

जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास असून कंपनीचे एमआयडीसीतील सुसज्ज ऑफिस, एक प्रशिक्षण केंद्र, गोदाम सील केली आहेत. मशिनरीसह कच्चा, पक्का असा सुमारे ४ कोटीचा माल पडून असल्याचे समजते. परंतु कंपनीचे हे खुळ एमआयडीसीत एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या अनी नामक व्यक्तीने संचालकांच्या डोक्यात घातले. शेफ म्हणून काम करत असताना संशयित त्याच्या संपर्कात आले. तेव्हा त्याने हा गुंतवणुकीचा फंडा त्यांना सांगितला आणि आर्जु टेकसोल कंपनी स्थापन झाली. विशेष म्हणजे हा मास्टर माइर्ड कंपनीध्ये कोणत्याच पदावर नाही. पडद्यामागुन त्याने ही सूत्र हालवत कंपनी चालवली.

मास्टरमाईंड असलेल्या अनी जाधव यांचे अनेक कारणामे आता बाहेर पडू लागले आहे. पोलीसांनी अनी जाधव यांचा शोध सुरु केल्यानंतर आता त्याने आपले लोकेशन सापडू नये याची खबरदारी गुन्हा दाखल होण्यापुर्वीच घेतली होती. जसे कागदपत्रांमध्ये अनी जाधवचे कुठेही नाव नसल्याचे स्पष्ट झाले होते.त्याच प्रमाणे स्वत:चे लोकेशन पहिल्यास्टेजमध्ये सापडू नये यासाठी अनी जाधव याने दुसर्याच्या नावे मोबाईल सिमकार्ड घेतली होती. त्या सिमकार्डच्या आधारे पोलीसांनी तपास केल्यानंतर दुसर्याच व्यक्ती त्या सिमकार्डच्या मालक असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अनी जाधवचे सध्याचे लोकेशन मिळवणे कठिण होत आहे.

स्वत:चा बचाव करण्यासाठी अनी जाधव यांने गुन्हा दाखल होण्यापुर्वीच प्लॅन तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये केवळ १५ ते २० दिवस शेफ म्हणून काम करणार्या अनी जाधव याने अल्पकालावधीत स्थानिकांशी ओळख काढून भव्य दिव्य ‘आर्जू टेकसोल’ कंपनीची स्थापना त्यांना करायला लावली होती.