काठीने मारहाण केल्याची कबुली; बंधपत्रावर आरोपीची मुक्तता

रत्नागिरी:- काजूच्या बिया चोरल्याच्या रागातून बेकारदेशीरपणे घरात शिरुन काठीने मारहाण केल्याच्या आरोपातून मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीची बंधपत्रावर मुक्तता केली.

जितेंद्र चंद्रकांत खडपे, (रा. नेवरे, ता. रत्नागिरी) याने २२ मार्च रोजी सकाळी ऋषभ विकास मयेकर यांच्या घरात बेकारदेशीर रितीने शिरुन काठीने मारहाण केली. १९ मार्च रोजी वेदांत जितेंद्र खडपे याला काजूच्या बिया नेत असताना मयेकर यांनी पकडले होते. याचा राग मनात बाळगून जितेंद्र याने हे कृत्य केले. असा आरोप ठेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे प्रकरण मुख्य न्यायदंडाधिकारी रा. म. चौत्रे यांच्यासमोर सुनावणीस आले. या वेळी आरोपीच्या वतीने प्ली बारगेनींग तरतुदीप्रमाणे गुन्हा मान्य करुन शिक्षेपासुन सुट द्यावी अशी विनंती करण्यात आली. न्यायालयाने यासंदर्भातील सर्व बाबी बारकाईने तपासल्या आणि आरोपीला ६ महिन्याच्या मुदतीत चांगले वर्तन ठेवण्याच्या अटीवर १५ हजार रुपयांच्या बंधपत्रावर मुक्तता करण्यात आली.