अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या वृध्दाला जामीन

रत्नागिरी:- आपली बहीण आणि आईसह शाळेत निकाल घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वागणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 65 वर्षीय व्यक्तीला 50 हजार रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला.

रामचंद्र शंकर शिवलकर (65) राहणार रत्नागिरी याने रत्नागिरीच्या विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला. पिडीत मुलगी 16 वर्षे 7 महिन्याची असून 30 एप्रिल रोजी ती आपली मोठी बहीण, आई यांच्यासह मोठ्या बहीणीचा निकाल पाहण्यासाठी गेली होती. यावेळी शिवलकर याने लज्जास्पद कृत्य केले. असा आरोप ठेऊन रत्नागिरी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी रामचंद्र याला 1 मे रोजी अटक केली. तेव्हा पासून तो तुरंगात आहे. त्याने जामीनासाठी दाखल केलेला अर्ज विशेष न्यायाधीश अनिल कुमार मल्लीकार्जुन आंबळकर यांच्या समोर सुनावणीस आला. न्यायालयाने उभयपक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. आरोप ठेवण्यात आलेली गुन्हा कलमे 7 वर्षे पेक्षा कमी शिक्षेची आहेत. अर्जदाराचे वय 65 वर्षे आहे. हे लक्षात घेऊन जामीन मंजूर करण्यात येत आहे. असे निकाल पत्रात नमूद करण्यात आले आहे.