भावावर हल्ला करणाऱ्या संशयिताचा जामीन मंजूर

खेड:- तालुक्यातील सवेणी मोहल्ला येथील सय्यदअली शेख हुसैन चिपळूणकर (54) यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी संशयित असलेला त्याचा सख्खा भाऊ शमसुद्दिन शेख हुसैन चिपळूणकर (65) यांची अ‍ॅड. पुनम जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामिनावर मुक्तता केलीे.

27 मे 2024 रोजी शमसुद्दीन चिपळूणकर याने सय्यदअली चिपळूणकर याला शिविगाळ करत, त्यांच्या पाठीवर व पायावर धारदार शस्त्राने वार केले, त्यामध्ये सय्यदअली हे जखमी झाले, याबाबतची फिर्याद सय्यदअली यांनी 27 मे रोजी रात्री 10:43 वाजता दिल्यानंतर खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. 187 / 2024 , भा.द. वि.सं. कलम 326 , 504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शमसुद्दिन याला 31 मे रोजी दुपारी 12:14 वाजता अटक करून त्याला प्रथम वर्ग न्यायालय, खेड येथे हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर याचदिवशी संशयितातर्फे खेड येथील प्रथम वर्ग न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. संशयितांच्यावतीने अ‍ॅड. पुनम जाधव यांनी युक्तीवाद केला, अ‍ॅड. जाधव यांचा युक्तीवाद ग्राहय धरून शमसुद्दिन चिपळूणकर याला अटी व शर्तीवर जामीन अर्ज मंजुर करण्यात आला आहे.