सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील साठरेबांबर भराडीनवाडी व तेरेकरवाडी येथील अंतर्गत रस्त्यावर मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. राकेश रमेश यादव (रा. साठरे बांबर, भराडीनवाडी, रत्नागिरी) व तुकाराम सदु खाकम (रा. साठरेबांबर-तेरेकरवाडी रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता. २८) सायंकाळी पावणेसहा व पावणे सातच्या सुमारास निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित साठरेबाबंर भराडीनवाडी व तेरेकरवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत होते. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार मोहन कांबळे व संतोष कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.