धनजीनाका येथे घरफोडी; १ लाख १६ हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी:- शहरातील धनजीनाका येथे घराच्या किचनच्या उघड्या खिडकीतून घरात प्रवेश करुन चोरट्याने १ लाख १६ हजार ५०० रोख रक्कम पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ मे ते १८ मे सकाळी अकराच्या सुमारास धनजीनाका-आंबेडकर रोड येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घर नं २५४३ ए, धनजीनाका-आंबेडकर रोड वरिल घराच्या किचन जवळील उघड्या खिडकीतून प्रवेश करुन घरातील १ लाख १६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम पळविली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.