पतसंस्था फोडून तब्बल १ कोटीचा मुद्देमाल लंपास

राजापूर:- राजापूर तालुक्यातील मिठगावणे येथील पतसंस्था फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह १ कोटीचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवार (दि.१४) सकाळी आकराच्या सुमारास उघडकीस आली.

मिठगावणे येथे श्रमिक पतसंस्था आहे. या पंतसंस्थेत काम करणारे कर्मचारी मंगळवारी नेहमीप्रमाणे पतसंस्थेमध्ये गेले असता त्यांना पतसंस्थेचे शटर आणि दरवाजाची कडी कोयंडी उचकटलेली दिसून आली. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांना पतसंस्थेतील सामान असताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच पतसंस्थेतील रोख रक्कम आणि ९० लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी नाटे पोलिसांना याची माहिती दिली. नाटे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत याबाबत नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु होती.