नाखरेत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे कालरकोंड येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या संशयिता विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.10 वा. करण्यात आली.

गणपत गुणाजी गोरीवले (75, रा.नाखरे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल प्रशांत कल्लापा पाटील यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी संशयित वृध्द हा दारु पिण्याचा परवाना नसताना नाखरे कालरकोंडकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरुन आत वाडीत जाणार्‍या पाखाडीमध्ये समोरु दारुची बाटली ठेवून दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.