काजरघाटी येथे ब्राऊन शुगरसह आरोपीला बेड्या

रत्नागिरी:- सुसंस्कृत रत्नागिरीत आता अनेक गैरप्रकार घडताना दिसून येत आहेत. रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने शहरालगतच्या वर्दळीच्या ठिकाणाी असलेल्या काजारघटी फाट्यावर मगदूम मस्तान शेख नामक तरुणाला ब्राऊन शुगर विकताना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या तरुणाकडे सुमारे 25 हजार रुपये किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर सापडले. पोलिसांनी पकडलेला हा तरुण रत्नागिरी शहरातील मच्छीमार्केट परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

रत्नागिरी शहरात पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गांजांचे मोठे रॅकेट उध्दस्त करण्यात आले होते मात्र आता काजारघटी फाट्यावर ब्राऊन शुगर विकताना मस्तान नामक तरुणाला घेतले ताब्यात घेतले गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी आकाश साळुंखे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ही कामगिरी केली. या प्रकरणात आणखी कोणते रॅकेट आहे का याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे. ब्राऊन शुगर प्रकरणात आणखी कोण आहे. या तरुणाने हे ब्राऊन शुगर कोठून आणले असा सवाल उपस्थित होत आहेे. दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे.