न्यायालयाच्या आवारातून दुचाकीची चोरी

रत्नागिरी:- अज्ञाताने चक्क जिल्हा सत्र न्यायालयाच्या पार्किंगमधुनच दुचाकी लांबवली. ही घटना सोमवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 ते सायंकाळी 6 वा. कालावधीत घडली आहे. या बाबत कार्तिकी किरण शिंदे (रा. माळनाका, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्या जिल्हा सत्र न्यायालयात नोकरीला आहेत.

सोमवारी सकाळी त्यांनी आपली ऍक्टिवा दुचाकी (एमएच-08-एए-8700) न्यायालयाच्या मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला असलेल्या पार्किंग समोरील मोकळ्या जागेत पार्क केली होती.सायंकाळी 6.30 वा. त्या न्यायालयातून बाहेर आल्या असता त्यांना आपली दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला दुचाकीचा शोध घेऊन अखेर शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.