सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; संशयिताविरुद्ध गुन्हा

पावस:- पूर्णगड-पावस मुख्य रस्त्याच्या बाजूला मेर्वीफाटा येथे टपरीच्या मागे मद्य प्राशन करणाऱ्या संशयिताविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरेश अशोक पाटील (वय ४०, रा. गावखडी, भंडारवाडी,
रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) फेंब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे मद्य प्राशन करण्याचा परवाना नसताना मेर्वीफाटा येथील एका टपरीच्या मागे सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी पोलिस
ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.