बकऱ्यांची मान पिरगळून ठार मारणाऱ्या संशयिताची जामिनावर सुटका

रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथे बकऱ्यांची मान पिरगळून ठार मारल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने 25 हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. मुबीन इस्माईल सोलकर (57, ऱा मुस्लिम मोहल्ला सोमेश्वर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा तक्रारदार व मुबीन सोलकर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. याच रागातून मुबीन याने 24 ते 25 जुलै 2023 च्या दरम्यान सोमश्वर चिधींचा बाग येथे तक्रारदार यांच्या बकऱ्यांच्या गोठ्याची कडी कुलूप तोडून आत पवेश केला. यावेळी मुबीन याने बकऱ्यांची मान पिरगळून त्यांना ठार मारले. अशी तक्रार तक्रारदार यांच्याकडून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच मृत बकऱ्यांचा पंचनामा देखील पोलिसांकडून करण्यात आला. तक्रारदार याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मुबीन सोलकर याच्याविरूद्ध भादंवि कलम 429,461 व पाण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनिमय 1960 चे कमल 11 (एल) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.