पूर्व वैमनस्यातून मालगुंडमध्ये काका-पुतण्यांमध्ये हाणामारी

रत्नागिरी:- पूर्व वैमनस्यातून काका-पुतण्यांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याची घटना मालगुंड मराठवाडी येथे घडली.याप्रकरणी दोघांविरुद्ध जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी व तक्रारदार हे नात्याने चुलत काका व पुतणे असुन बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास यातील तक्रादार व त्याचा मुलगा विराज असे घराचे समोर असलेल्या बिल्डींगमध्ये मोबाईलची रेंज मिळणेकरीता गेले होते. त्यावेळी त्यांचे घरामध्ये संशयित आरोपी याचा मुलगा रुद्र हा हातात बॅट घेवुन गेलेला  त्यांना दिसला. यातील तक्रारदार महेश साळवी यांचा मुलगा वेदांत हा घरामध्ये बसलेला होता. आपल्याला मुलाला मारहाण होईल या भीतीपोटी महेश यांनी समोरच्या बिल्डींगमधुन कोण आहे रे तिकडे? असा आवाज दिला त्यावेळी रुद्र हा  महेश यांच्या घरामधुन पळुन गेला. त्यावेळी महेश हे  पुन्हा खाली येऊन मुलगा वेदात याला काय झाले अशी विचारणा केली. त्यावेळी तुझ्या डोक्यात बॅट घालू का? अशी धमकी रुद्रने दिल्याचे सांगताच त्याबाबतची विचारणा महेश यांनी केली.

याचा राग मनात धरून महेश याना लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी महेश सदानंद साळवी यांनी जयगड पोलीस स्थानकात तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी गौरव शशिकांत साळवी, रोहन शशिकांत साळवी यांचे विरुद्ध भा.द.वि.क ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.