चंपक मैदानात तरुणीवर अत्याचार; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- माझ्या दुचाकीवर बस अशी जबरदस्ती करून खासगी रुग्णालयात रिशेप्सनिस्ट काम करणाऱ्या मुलीला दुचाकीवरून जबरदस्तीने नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध शहर पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका खासगी रुग्णालयात रिशेप्सनिस्टचे काम करणारी तरुणी ३० जून रोजी नेहमी प्रमाणे आपले काम आटोपून रस्त्याने चालत घरी निघाली होती.  रात्री ८ वाजण्याचे सुमारास ती तरुणी ड्युटी संपवुन चालत पटवर्धन वाडीच्या रिक्षास्टॅन्डच्या पुढील बाजुस चालत जात असताना तिच्या मागून एक मुलगा बाईक वरुन तिच्या बाजूने गेला. माझे दुचाकीस्वार थोडा पुढे जावुन थांबला. त्यावेळी त्याने त्या तरुणीला हाक मारली व माझ्यासोबत गाडीवरून चल असे सांगू लागला.त्यावेळी तरुणीने त्याच्याबरोबर गाडीवरुन जाण्यास त्याला नकार दिला.  

अखेर जबरदस्तीने त्या तरुणाने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसण्यास भाग पाडून तिला चंपक मैदानाकडे घेऊन गेला. मैदानाजवळ गाडी थांबवुन त्याने त्या तरुणीचा हात धरुन तिला जबरदस्तीने झुडपात घेऊन गेला व तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. त्यावेळी तरुणीने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे कोणीच नसल्याने कोणी मदतीसाठी आले नाही. तरुणीने आरडाओरड केल्याने त्या तरुणाने तिचा गळा दाबला. घडला प्रकार मी कोणाला सांगणार नाही, मला घरी सोड असे त्या तरुणीने सांगून आपली सुटका करून घेतली. त्या तरुणीचे कपडे चिखलाने माखल्याने तु कामाच्या ठिकाणी पडली असे घरी सांग असे बोलुन तो तरुण तिथून निघून गेला. 

घरी आल्यानंतर घडला प्रकार त्या तरुणीने आपल्या आईला सांगितला आणि सारा प्रकार उघडकीस आला. तो तरुण त्याच परिसरातील होता. त्याचा शोध घेऊन येथील रहिवाशांनी चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी पीडित तरुणीने तक्रार दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी ऋषिकेश तळेकर याच्या विरुद्ध भा.द.वि.क ३७६, व फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.याचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.