जमावबंदी डावलणाऱ्या राजीवड्यातील दोनशे जणांवर गुन्हा.

रत्नागिरी:-राजीवडा येथे कोरोना रुग्ण असताना आणि जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी लागू केलेली असताना जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलणाऱ्या राजीवडा येथील 200 जणांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये जियाउद्दीन फंसोपकर, फैजान फंसोपकर, सलमान पकाली, राहील फंसोपकर, मुज्जफर मुजावर, अरमान मुजावर, शमशुद वस्ता, नबील, अकिल, गुड्डू कोतवडेकर, जूबेड वस्ता, रिज्जू पकाली, हसनमियाँ, चर्सी बादशाह, खालिद, आपान मलबारीचा मुलगा, रियाज फँसोपकर या अठरा जणांसह आणखी 150 ते 200 अनोळखी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी यांनी राजीवडा येथे एक कोरोना संसर्ग बाधित रुग्ण असताना कोरोना विषाणुचे अनुषंगाने पसरण्याचा संभव आहे हे माहित असताना बेकायदेशीर जमाव केला. बेकायदेशीर जमाव जमवुन राजीवडा, खडपेवठार बाजुकडील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवुन हयगईने बेकायदेशीर कृती केली. जिल्हाधिकारी यांचे जमाव बंदी आदेशाचे उल्लघंन केले तसेच फिर्यादी हे शासकीर्तव्य पार पाडीत असताना त्यांचे जवळील . मोबाईल व लाठी हिसकावण्याचा प्रयत्न करुन ने फिर्यादी यांचे डोक्यात मारून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.