वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- फेसबुक पेजवर समाजात तेढ निर्माण होईल असे व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात सोशल मीडियावर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात थेट गुन्हे दाखल होत असताना रविवारी शहर पोलिसांनी एका मनसे कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे..

अमोल श्रीनाथ एम . एन . एस . या फेसबुक अकांऊट धाररकाने त्याचे फेसबुक अकाऊंटवर स्वतःचा एक व्हीडीओ सुमारे 19 तास अगोदर प्रसारित केला आहे . या व्हीडीओमध्ये फेसबुक धारक अमोल श्रीनाथ एम . एन . एस . याने त्याचे स्वतःचे नाव सांगन तो राज साहेबांचा एक कट्टर महाराष्ट्र सैनिक व रत्नागिरीचा सुजाण नागरिक असल्याचे सांगून त्याने फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये धार्मिक भावना दुखावल्याचे तसेच सार्वजनिक शांतता बिघडुन समाजातील वर्गा वर्गात शत्रुत्व , देशभाव , दुरावा निर्माण करणारी व वाढवणारी विधाने बोलल्याचे दिसून आल्याने त्याच्या विरोधात भा.द.वि.क298 , 505 ( 1 ) ( 2 ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.