रजनी भायजेंच्या खुन्याचा शोध सुरू

रत्नागिरी:-वेळवंड भायजेवाडीतील ५६ वर्षीय रजनी रविंद्र भायजे या महिलेची हत्या झाल्याचे पोलीसांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघड झाले असून पोलीसांनी अज्ञाताविरोधात खूनासह मृतदेह जाळून पूरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र हत्या नेमकी कोणी केली? हत्या कारण्यामागील नेमके कारण काय? हे अध्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र जवळच्या व्यक्तीनेच रजनी भायजे यांची हत्या केल्याची शक्यता आहे. हत्या करुन नंतर त्यांचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचीही शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे. ग्रामीण पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकांची चौकशी सुरु केली आहे.तर शनिवारी पोलीस अधिक्षक डा@.प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, उपविभागिय अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरिक्षक सुरेश कदम यांनी भेट देवून परिसराची पहाणी केली आहे. रजनी भायजे यांच्या हत्येचे गुढ कायम राहिले आहे.
रजनी भाजये या आपल्या नातेवाईकांसह भाजयेवाडीत रहातात. सुमारे ३० वर्षापुर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले. तर एका मुलीचा विवाह सुमारे सात वर्षापुर्वीच झाला आहे. त्या त्यांच्या सामाईक घरात दिराच्या कुटुंबासमवेत रहात होत्या. गुरुवारी रात्री त्यांच्या दिराने त्यांना त्यांच्या खोलीत जेवण नेऊन दिले होते. त्यानंतर दिराचे कुटुंबियही जेवण करुन झोपी गेले असे रजनी भायजे यांच्या दिरांने पोलीसांना सांगितले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्या त्यांच्या खोलीतून बाहेर केव्हा गेल्या हे नातेवाईकांनी माहित नसल्याचे हि नातेवाईक सांगत आहे. त्यामुळे रजनी भायजे यांना घरातून बाहेर काढून त्यांची हत्या करुन मृतदेह घरापासूनच १०० मिटर अंतरावर जा कसा? घरा जवळच असलेल्या शेतात भाजावळीसाठी ठेवलेल्या कवळावर त्यांचा मृतदेह ठेवून त्यावर रोकेल ओतून पेटवून देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीतून पूूढे आले आहे.