रत्नागिरी:- कोरोना लसींचा जिल्ह्याला होत असलेला पूरवठा कमी असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. यासाठी प्रशासनस्तरावरून शासनाच्या निर्देशानुसार यापुढे पुढील आदेश होईपर्यंत फक्त 45 वर्षावरील वयोगट असणाऱ्या नागरिकांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. खास करून दूसरा डोस देण्यात येणार आहे. जर लसींचा साठा उरला तर 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांनाच पहिला डोस दिला जाईल. हे लसीकरण, ऑफलाईन सुध्दा होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिक कोविड -19 पासून संरक्षण होण्यासाठी सर्व नियमांचे पालन करत आहात. रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डॉक्टर्स, दवाखाने यांच्या वरील ताण वाढला आहे. यावर एकमात्र उपाय म्हणजे लसीकरण. लसीकरण नियोजित वेळेवर आणि व्यवस्थित होण आवश्यक आहे. यापूर्वी लसीकरण दोन भागात होत होते. पहिला भाग म्हणजे 45 वर्षावरील वयोगट व दूसरा भाग म्हणजे 18 ते 44 चा वयोगट. 18 ते 44 च्या वयोगटाला राज्यशासनाचा लस पूरवठा होता. 45 वर्षांवरील साठी केंद्रशासनाकडे हा विषय होता. मात्र लसींचा पूरवठा कमी होत असल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. याचा ताण प्रशासनावरही आलेला होता. याबाबत जिल्हास्तरावरून शासनाला कळविण्यात आले होते. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आता शासनाच्या निर्देशानुसार यापुढे पुढील आदेश होईपर्यंत फक्त 45 वर्षावरील वयोगट असणाऱया नागरिकांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. खास करून दूसरा डोस देण्यात येणार आहे. जर लसींचा साठा उरला तर 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांनाच पहिला डोस दिला जाईल. हे लसीकरण, ऑफलाईन सुध्दा होणार आहे. यामुळे आत्तापर्यंत असलेली संभ्रमावस्था नष्ट होणार आहे.