खेड:- शहरातील एका तरुणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या नीरज जांगरा (रा, हरियाणा) यास न्यायालयाने जामीन मंजूर केला. संशयिताच्यावतीने ॲड. स्वरूप थरवळ यांनी युक्तीवाद केला.
व्हॉटसॲप मॅसेजद्वारे एका तरुणास एआरके इन्व्हेन्समेंट ग्रुप या कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवत २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केली होती. येथील पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलीस कोठडीनंतर त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. संशयिताच्यावतीने अँड. थरवळ यांनी येथील प्रथम वर्ग न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असता काही अटी व शर्थीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला..