२३ वर्षीय कुविख्यात गुंडाला ६ पत्नी अन् २५ मुले; पोलीसांच्या कारवाईनंतर कारनामे होत आहेत उघड

रत्नागिरी:-राज्यातील अनेक पोलीस स्थानकात गुन्हे दाखल असलेला कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला रत्नागिरीतील चांदोर येथून अटक केल्यानंतर त्यांने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मात्र संदीपचे अनेक कारनामे अहमदनगर पोलीसांच्या तपासात बाहेर येवू लागेले आहे.अवघ्या २३ वर्षीय संदीप भोसले याला सहा पत्नी असून पंचवीस मुलं‚मुली असा त्याचा मोठा परिवार  असल्याचे धक्कादाय वास्तव पुढे आले आहे. 

संदीप भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर, पुणे, सातारा, बीड व औरंगाबाद येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, बेकायदेशीररित्या हत्यार अशा प्रकारचे एकूण गुन्हे दाखल आहेत. तसेच अहमदनगरला एक, बीडला एक व पुणे एक असे तीन जिल्ह्यात तीन मोक्काअंतर्गत गुन्हे आहेत. दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोड्या, पोलिसांच्या रखवालीतून पळून जाणे अशा २६ गुन्ह्यात तो फरारी होता. त्याला अटक केल्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. 

अटल केल्यानंतर पोलीसांनी संदीपची चौकशी सुरु केली आहे. त्यामध्ये गुन्हेगार असलेल्या संदीपचे अनेक कारनामे पुढे येत आहेत. संदीप भोसले याला सहा  पत्नी असून सुमारे पंचवीस मुलं‚मुली असा त्याचा संसार आहे. अनेक वर्षांपासून तो फरार होता. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो पळून जाण्याचा यशस्वी झाला होता. अखेर त्याला पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.

संदीप भोसलेचे अनेक महिने चांदोर येथे वास्तव्य होते. सराईत गुन्हेगार असलेल्या संदीपने चांदोर येथील वास्तव्याच्या कालवधीत रत्नागिरीत कोणते कारनामे केले आहेत. पोलीसांच्या चौकशीत पुढे येण्याची शक्यता आहे.त्यादृष्टीने स्थानिक पोलीसांनी चौकशी सुरु केली आहे. त्यामधून संदीपने चांदोर येथील वास्तव्याच्या दरम्याने नेमके काय केले ?हे स्पष्ट होणार आहे.