हॉटेलमध्ये किरकोळ कारणातून सातजणांना मारहाण

रत्नागिरी:- शहरातील चर्मालय येथील एका हॉटेलमध्ये किरकोळ कारणातून सातजणांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघा संशयितांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सुफियान गुहागरकर (वय २२), भूषण सावंत (वय २३) आणि जैद, मजगावकर (२५, रा. तिघे रा. रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार बुधवारी (ता. १२) रात्री स्टेट बँक कॉलनी, चर्मालय परिसरात घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमल रामकुमार जांगिड (वय ३५, सध्या रा. कुवारबाव, रत्नागिरी) हे त्यांचे सहकारी मित्र अमितकुमार, रतीष, पवनकुमार, विपिन, मिथिलेश रामसहाय राम, रवीकुमार यांच्यासोबत हॉटेलमध्ये जेवत होते. तेव्हा त्यांच्या पाठीमागे बसलेल्या संशयितांनी मोठ्याने बोलू नका, असे सांगितले. यावरून वाद झाला.