पाच जणांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- आपल्या हॉटेलमधील काम सोडल्याच्या रागातून शहरातील मारुती मंदिर येथील एका हॉटेलमधील वेटरला दोघांनी मारहाण केली.त्यानंतर हॉटेल मालक महिलेला आणि तिच्या भावाला धक्काबुक्की करुन महिलेच्या अंगातील टॉप फाडत मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत काउंटरमधील 10 हजार रुपये काढून घेतले.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शनिवार 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वा.घडली.
सिध्देश निकम, त्याचा भाउ आणि इतर तिन अशा एकूण 5 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या विरोधात फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार,शनिवारी सायंकाळी संशयितांनी त्यांच्या हॉटेलमध्ये घुसून हॉटेलमधील संदिप मौळे या कामगाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.तेव्हा फिर्यादी महिला आणि तिच्या भावाने संदिप मौळे या कामगाराला सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांना धक्काबुक्की करत हॉटेल काउंटरमधील रोख 10 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर संशयितांनी फिर्यादीचा भाउ परिमल याला संगनमताने कॉलर पकडून त्याच्या उजव्या डोळ्यावर कोणत्यातरी लोखंडी वस्त्ाूने मारहाण केली. याप्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम 392,354,452,324, 323,143, 147,149, 504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.