रत्नागिरी:- शहरातील हिंदू कॉलनी येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने १ लाख ३० हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी प्रदीप वेर्णेकर (वय २९) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबतची फिर्याद प्रदीप वेर्णेकर यांनी शहर पोलीस स्थानकात दिली आहे. फिर्यादी त्यांच्या कुटुंबियांसह २८ ऑक्टोबर रोजी बाहेरगावी गेले होते. १ नोव्हेंबर रोजी घरी परतले असता त्यांना या चोरीबाबत समजले. चोरट्याने घरात प्रवेश करून दोन्ही मजल्यावरील कपाटे उघडून आतील सोन्याचे मंगळसूत्र, कानातले, सोन्याची लगड, तसेच चांदीचे दागिने, देवाची मूर्ती आणि रोख रक्कम असा १ लाख ३० हजाराचा ऐवज चोरल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.