हापूसचे उत्पादन वाढल्याने दरात घसरण

रत्नागिरी:- मागच्या वर्षीच्या हंगामामध्ये आंबा उत्पादक शेतकरी संकटात होते. परंतु, यंदा परिस्थिती थोडी बदलल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पाऊस आणि किडींचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हापूस आणि केसर आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीचे असल्याचे समाधान सध्यातरी बागायतदरात आहे. कोकणात आंब्याचे उत्पादन वाढल्याने दरही काहीसे कमी असल्याचे सध्या बाजारात दिसून येत आहे. तसेच उत्तम प्रतिच्या आंब्याला परदेशात मागणी वाढली आहे.

राज्य कृषी पणन मंडळाने 5 हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट बाजार समितीला दिले आहे. त्यानुसार कोकणातील बागयतदारांनी जास्ती जास्त उत्पादन निर्यातीकडे पाठविण्याचे आवाहन पणन मंडळाने केले आहे. या वर्षी निर्यातीलाही अनुकूल वातावरण आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये निर्यात करण्याचे समितीचे उद्दिष्ट आहे. तसेच ऑस्ट्रेलियातही जवळपास 140 टन आंबा निर्यातीकरिता पाठविला गेला आहे. त्यामध्येही कोकणातील बागायतरदांचा तीस ते 35 टक्क सहभाग आहे.

कोकणातील उत्तम प्रतिचा आंबा यावेळी सर्वच बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच बागायतदरांनी निर्यातीला प्रोत्सदहन देण्याची मागणी पणन मंडळाने केली आहे. त्यामुळे जास्तीजास्त परदेशी चलन भारातात येण्यास मदत होणारअसून त्याचा पिरणाम बागायतदरांच्याही अर्थ प्रणालीवर होणार आहे.
या वर्षी आंब्याचा हंगाम चांगला सुरू झाला असून, अनुकूल हवामानामुळे चांगले पीक येण्याची आशा शेतकर्‍यांना आहे. कोकण विभागातील उत्पादक विशेषतः उत्साही आहेत. मुळात कर्नाटकातून येणारे आंबे अद्यापही बाजारात उपलब्ध झाले नाहीत. ज्यामुळे हंगामाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकणातील हापूस केसर या प्रमुख जाती निर्यातीस जात आहेत. वाशी बाजारसमितीमधून हा आंबा परदेशात निर्यात होणार आहे.