रत्नागिरी:- हातखंबा येथे पुन्हा एकदा अपघात झाला आहे. सोमवारी सकाळी भरधाव टँकरने रस्त्या शेजारी असलेल्या काही दुकानांना धडक दिली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात केवळ टँकर चालक जखमी झाला आहे. टँकरने धडक दिल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले असून मदतकार्य हाती घेण्यात आले आहे.
