Wednesday, October 14, 2026
spot_img
Home रत्नागिरी हातखंबा येथे कातळावर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

हातखंबा येथे कातळावर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा गावातील सांबर टाके परिसरात मोकळ्या कातळ जमिनीवर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० वर्षे असल्याची प्राथमिक नोंद असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा येथील सांबर टाके परिसरात प्रकाश गुरव यांच्या मालकीच्या जागेतील मोकळ्या कातळ जमिनीवर एक पुरुष मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव आणि गाव याबाबत माहिती उपलब्ध नसल्याने त्याची ओळख पटविण्याचे काम महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पुढील तपासादरम्यान त्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.