रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील आंबा बागेत अज्ञात प्रौढ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ही घटना बुधवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.15 वा.सुमारास निदर्शनास आली.
याबाबत श्रीकांत जठार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानुसार, त्यांची हातखंबा येथे आंबा बाग आहे. त्या बागेत कामाला असलेल्या नेपाळी गुरख्याने बुधवारी सकाळी त्यांना फोन करुन आपल्या बागेत एक अज्ञात प्रौढ नायलॉन दोरीने आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याची माहिती दिली. त्यानंतर श्रीकांत जठार यांनी बागेत जाउन याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. मृताच्या हातावर 18-8-23 आणि ‘मिय यू डॅड’ असा टॅटू असून याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.









