हळदीचा कार्यक्रम संपल्याचे सांगितल्याने तिघांकडून राडा; शहर पोलिसांत गुन्हा दाखल

रत्नागिरी:- हळदीच्या कार्यक्रमात जमलेल्या लोकांना क्रार्यक्रम संपला असल्याचे सांगितले. या रागातून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक खोतरा (रा. तांबट आळी), साई पोटफोडे, आणि रसाळ (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असे संशयित आहेत. ही घटना शनिवारी (ता. २३) दुपारी पावणे तीनच्या सुमारास शहरातील जुनी तांबट आळी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिलींद मधुकर सावंत हे शुक्रवारी (ता. २२) पत्नी व मुलगी यांच्या सोबत त्यांच्या मेव्हुण्याच्या घरी तांबटआळी येथे हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर शनिवारी दुपारी एक च्या सुमारास जमलेल्या लोकांना कार्यक्रम संपलेला असून तुम्ही आता आपआपल्या घरी जा असे सांगितले याचा राग मनात धरुन तीन संशयितांनी शिवीगाळ व करुन मारण्याची धमकी दिली व लोखंडी रॉड व लाकडी काठीने मिलींद सावंत यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर मारून दुखापत केली. तसेच सावंत यांच्या दुचाकीवर दगड मारुन गाडीचे नुकसान केले. फिर्यादीच्या पत्नी भांडण सोडविण्याकरिता गेल्या असता तिलाही मारहाण केली. ती खाली पडल्याने फिर्यादी यांच्या पत्नीला दुखापत झाली आहे.