हरचेरी कसबा येथे प्रौढास मारहाण; दांपत्याविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील हरचेरी कसबा येथे अज्ञात कारणातून प्रौढास शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी पती-पत्नी विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 5 वा. सुमारास घडली.

जयसिंग दत्तात्रय राऊत आणि देवयानी जयसिंग राऊत (दोन्ही रा.हरचेरी, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात चंद्रशेखर मधुकर कारेकर (45, रा.कसबा हरचेरी, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,शुक्रवारी शेत काम करत असताना ते आंबार्डेकर यांच्या 3 गुंठे जमिनीतील पेरणीचे काम पाहण्यासाठी गेले होते.तेव्हा राऊत दाम्पत्याने त्या ठिकाणी येऊन चंद्रशेखर कारेकर यांना शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.