हयातनगर येथे बंद घर फोडणाऱ्या महिलेला बेड्या

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजिकच्या हयातनगर येथे बंद घर फोडून फोडून सुमारे ८२ हजारांचा ऐवज लांबविणार्या रुहिन अजिज हकिम (वय ३७,रा.हयातनगर) या विवाहितेला शहर पोलीसांनी अटक केली आहे. तिच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड जप्त करण्यात आली आहे. डुप्लिकेट चावीच्या मदतीने तीने बंद फ्लॅट उघडून तीने ऐवज लांबविला असल्याचे पोलीसांच्या तपासात पुढे आले आहे.

उद्यमनगरनजिकच्या हयातनगर हाऊसिंग सोसायटीमधील फ्लॅट नं ३०३ चा पुढील लाकडी दरवाजाला लावलेले कुलुप काढून घरात प्रवेश केला. घरातील बेडरुम मधील लाकडी बेडमध्ये ज्वेलरी बॉक्स मध्ये ठेवलेले ३० हजार रुपयांची एक सोन्याची बांगडी, १६ हजाराचे कानातील जोड, १२ हजाराची चेन असा ८२ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला होता. या प्रकरणी सफुरा जाविद डांगे (४३) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पोलीस निरिक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक हरमUकर, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सावंत हे तपास करत असताना हयातनगर येथीलच एक महिला छोट्या चोर्या करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी संशयीत महिला तुमच्या संपर्कात आहे का? अशी विचारणा सफुरा जाविद डांगे यांना केली होती. त्यांनीही संशयीत महिला आपल्याकडे येवून गेली होती. काही दिवसांपुर्वी तिने आपले कुलपासह चावीही घेवून गेल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानंतर पोलीसांचा संशय अधिकच वाढला.

रुहिन हकिम या महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरु असताना तीने चोरी केल्याची कबूली पोलीसांना दिली. त्यानंतर चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम हस्तगत करण्यात शहर पोलीसांना यश आले आहे. चौकशी दरम्यान रुहिन हकिम हिची चोरीची नवी पद्धत पुढे आली आहे. एकाच बिल्डिंगमध्ये राहणार्या रुहिनने आपल्याला बाहेर जायच आहे. कुलूप नसल्याने तुमचे कुलुप द्या असे सफुरा डांगे यांना सांगून ती कुलूप व चावी घेवून गेली होती. त्यानंतर पुन्हा तीने कुलूप आणून दिले. याच कालावधित तीने त्या कुलपाची डुप्लिकेट चावी तयार करुन घेतली.
ज्यावेळी सफुर डांगे ह्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्याच वेळी त्यांची मुलगी मावशीकडे रात्री झोपण्यासाठी गेली होती. याच संधीचा फायदा घेत रुहिनने बंद फ्लॅटचे कुलुप उघडून आत प्रवेश करुन आतील ऐवज लांबविल्याचे तीने पोलीसांना सांगितले आहे.