हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन;  करबुडेतील संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- न्यायालयाच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंधन करणाऱा गुन्हेगार तालुक्यातील करबुडे येथे आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील बाळू पाचकुडे (रा. मावळती पाचकुडेवाडी, करबुडे, रत्नागिरी) असे गुन्हेगाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी सातच्या सुमारास मावळती पाचकुडेवाडी, करबुडे येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील पाचकुडे यास उपविभागीय दंडाधिकारी, न्यायालयाचे आदेश नुसार २७ डिसेंबर २०२४ पासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या तिन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपारीचे आदेश देण्यात आले होते. मात्र संशयित गुन्हेगार १ जानेवारीला २०२५ ला स्वप्नील पाचकुडे हा तालुक्यातील करबुडे येथे सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण कोकरे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.