स्वप्नाली सावंत खून प्रकरण; मुदस्सर डिंगणकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर 

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणातील मुदस्सर लियाकत डिंगणकर या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तो मंजूर केला आहे. 

१ सप्टेंबरला स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी घराच्या स्वयंपाकगृहात गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. या खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्याकडे होता. तपासात पोलिसांनी सावंत यांचे पती सुकांत उर्फ भाई गजानन सावंत ( ४७ ), रुपेश उर्फ छोटा भाई कलमालाकर सावंत ४३ व प्रमोद उर्फ पम्या बाळू रावणंग ( सर्व रा. सडामिऱ्या , रत्नागिरी ) यांना अटक करुन न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणी वकिलांनी सहकार्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. संशयित भाई सावंत व डिंगणकर यांच्यात ३८ मोबाईल कॉल स्वप्नालीचा खून होण्याआधी झाले होते. त्यासाठी पोलिसांकडून चौकशी होणार होती. मात्र डिंगणकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी ( ता . २० ) न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली . वकिल डिंगणकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला.