रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील सोसायटीच्या मिटिंगमध्ये प्रौढेला मारहाण करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडल्याप्रकरणी तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना रविवार 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वा.सुमारास घडली.
राहुल वासुदेव फडके (रा.नाचणे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात पिडीतेने दिलेल्यात तक्रारीनुसार, त्यांच्या सोसायटीची आज सकाळी मिटिंग होती.त्यावेळी पार्किंगमध्ये गाड्या पार्क करण्यावरुन त्यांच्यात आणि राहुल फडकेमध्ये वाद झाला.या वादातूनच राहुलने प्रौढेला हातांच्या थापटांनी मारहाण केली.या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तूटून नुकसानही झाले.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.









