रत्नागिरी:- सोशल मिडियावरुन बॅंक खात्यातून ऑनलाईन फसवणूक हे आता नित्याचे झाले आहे. मोबाईल लिंक, ओटीपी, माहिती देणे हे सर्व सामान्य माणसांकडूनही ही अनावधाने चूक होते; तर काही मोबाईलवरिल मॅसेजची माहिती असताना देखील मोबाईल अति वापरामुळे, नवीन काहीतरी शोधण्याच्या अमिषाने चूक होते. अगदी असेच तालुक्यातील जयगड-संदखोल येथील शिक्षकाने सोशल मिडियाच्या व्हॉटसॲपवर आलेली बॅंक ऑफ इंडियाची पीडीएफ फाईल ओपन केली. मोबाईलचा ॲक्सेस घेऊन अज्ञाताने पगार खाते व बचत खात्यातून ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची फसवणूक घटना उघडकीस आली आहे. हि घटना १६ व १७ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास अकबर मोहल्ला-जयगड येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नासिर अब्दुल्ला बावडे (वय ६१, रा. अकबर मोहल्ला-जयगड, रत्नागिरी) हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचा संदखोल केंद्र व्हॉटसॲप ग्रुप आहे. या ग्रुपवर बॅंक ऑफ इंडिया संबंधित माहितीची अनोळखी, बनावट पिडीएफ फाईल व एपीके फाईल पाठविल्याने ही फाईल फिर्यादी नासिर बावडे यांनी डाऊन लोड करुन पाहिले असता अज्ञात संशयित मोबाईल धारकाने याने फिर्यादी नासिर यांच्या मोबाईलचा ॲक्सेस घेऊन बॅंक ऑफ इंडिया च्या पगार खाते व बचत खाते मधून ६ लाख ८५ हजार ५१४ इतकी रक्कम तसेच शिला शंकर वाघधरे (रा. अंबुवाडी) यांचे बॅंक ऑफ इंडिया खात्यातून ७१ हजार, असे ७ लाख ५६ हजार ५१४ रुपयांची रक्कम फिर्यादी व शिला वाघधरे यांची रक्कम संशयिताने अनोळखी बॅंक खात्यावर वळती करुन फिर्यादी व शिला वाघदरे या दोघांची फसवणूक केली.
या प्रकरणी नासिर बावडे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.









