भरधाव कंटेनरच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

सावर्डे येथील घटना

चिपळूण:- सावर्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत आनंद सुंदर हेबरम (१७, झारखंड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मुळचा झारखंड येथील रहिवासी असलेला हा तरुण रस्ता ओलांडत असताना अपघात घडल्याची माहिती पुढे येत आहे. अपघातानंतर कंटेनर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले.

या अपघातप्रकरणी त्याच्यावर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

प्रांजल अजय बिर्या (मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत आनंद याचे मित्र सावर्डे येथे कामास असून त्यांच्याकडे तो काही दिवसांपूर्वी आला होता. तो मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सावर्डे

येथे जुने पोलीस ठाणे परिसरात रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक प्रांजल बिर्या गोव्याच्या दिशेने पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून असुर्डे येथे त्याला अडवून बिर्या याच्यावर गुन्हा दाखल ताब्यात घेतले. करण्यात आला आहे. आनंद हेबरम याचा मृतदेह विच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आला. 

गतिरोधक का नाही?

दरम्यान, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी नेहमीच वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने त्यावर नियंत्रण यावे, यासाठी अनेकदा सावर्डे ग्रामस्थांनी गतिरोधकाची मागणी केली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही. या दुदैवी घटनेनंतर तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग येईल का, असा सवाल केला जात आहे.