चिपळूण:- वादातून एकाने दुसऱ्यास जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी तालुक्यातील सावर्डे येथे घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या गटातील एकाने मारहाणप्रकरणी परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ साहीद खलपे, शैलेश उदेग, राजू मोहिरे (तिघे-सावर्डे), सुशिल चव्हाण (कोकरे), संदीप शंकर सावंत (कोसबी), सचिन बेचावडे (कामथे) व अन्य दोघेजण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद वैभव भालचंद्र सावंत (38, सावर्डे) याने दिली.
2 नोव्हेबर रोजी वैभव याला त्याचा मित्र मंगरु सोलकर याने त्याच्या दुकानातील कामगारांना कोणीतरी मारत आहे. तेथे तुम्ही जाऊन बघा, असे सांगितल्यानुसार वैभव व त्याचे मित्र प्रशांत जाधव हे तेथे गेले. त्यावेळी तौसिफ याला विचारणा करुन कामगारावर चोरीचा संशय असले तर त्याची पोलीस स्थानकात तक्रार सांगताच याचा राग तौसिफ याला आल्याने त्याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. यात त्या दोघांसह घटनास्थळी आलेला सोलकर मारहाणीत जखमी झाला. या प्रकरणी तौसिफ याच्यावर जातीवाचाक शिवीगाळ, मारहाणीचा तसेच वरील सातजणांवर बेकायदा जमाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तौसिफ यानेही परस्परविरोधी फिर्याद दिली असून त्यानुसार त्याचे बांधकामासाठीचे स्टील चोरीस गेल्याने त्यासाठी तो चौकशीसाठी मंगरु सोलकर याच्या भंगार दुकानात आला. त्या ठिकाणी वैभवसह प्रशांत तेथे आले व झालेल्या वादातून त्यानी तौसिफ याला धक्काबुक्की केली व विवेक भालचंद्र सावंत याने केलेल्या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा एकूण 11 जणांवर परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.