सावर्डेतील दोन कात कारखाने अवैध

चिपळूण:- सावर्डे भागातील सचिन कात कारखाना व अन्य एक कारखाना अवैध व परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याची बाब आता उघड झाली आहे. यापैकी कातभट्टी व खैर लाकूड संदर्भात काही दिवसांपूर्ची संबंधित विभागांनी छापा टाकला होता. हे प्रकरण उघडकीस येण्यास मुश्ताक अदब तासिया या संशयिताचा खैर तस्करी प्रकरणात प्रमुख भूमिका असल्याच्या धागेदोर्‍यावर हे कारखाने अवैध असल्याचे उघड झाले.

मुश्ताक तासिया या संशयिताचे खैर तस्करी प्रकरणात मुख्य संशयित असून तसेच त्याचे फळाचे दुकान आहे. मध्यंतरी सुरत (गुजरात) वन विभागाच्या तपास पथकाने संशयितास चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, संशयिताकडून दाखल अटकपूर्व जामीन अर्ज गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला व मांडवी कोर्टात हजर करून पुढील कारवाईस आत्मसमर्पण करा, असे आदेश दिले.

8 डिसेंबर रोजी संशयिताचा ताबा सूरत वन विभागाच्या तपास पथकाला दिला. पुढील कार्यवाहीमध्ये चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात असलेला सचिन कात कारखाना येथे मोठ्या प्रमाणात लाकूड व माल सापडला. त्या ठिकाणी बिस्कीटे सापडली व तयार केलेल्या फायनल प्रॉडक्ट हा सर्व ऐवज छाप्यादरम्यान बिस्कीटांचे नमुने तपासणी पथकाने तपासले. संबंधित कारखाना हा परवाना नसताना आणि अवैध असल्याचे आढळले. विक्रांत दत्ताराम तेटांबे यांच्या नावे चालविला जाणारा अन्य एक विनापरवाना कात कारखान्यावर यापूर्वीच कारवाई केली.