सावकार निलेश कीर याच्या साथीदाराला कुवारबाव येथून बेड्या

रत्नागिरी:- शहरातील सावकारी प्रकरणातील निलेश कीर यांच्या अन्य एका साथिदाराच्या शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने संशयिताची प्रकृती ठिक नसल्यामुळे न्यायालयीन कोठडी सुनावली. राजेंद्र बाळकृष्ण इंदुलकर (४६, रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध मंदार सुरेश सुर्वे (वय ३८, रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्यानुसार २०२१ मध्ये त्यांनी निलेश कीर आणि राजेंद्र इंदुलकर कडून आपल्या आर्थिक अडचणीसाठी १ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यासाठी त्यांनी सहिचे बॉन्ड, कोरे चेक या दोघांना दिले होते. या रकमेची अधिक व्याजदराने त्यांनी २ लाख २४ हजार ६०० रुपयांची परतफेडही केली होती. परंतू, त्यानंतरही निलेश कीर आणि राजेंद्र इंदुलकर, मंदार सुर्वे यांच्याकडे आणखी ३ लाख ८० हजार रुपयांची मागणी करत होते. त्यासाठी त्यांना त्रास देउन ठार मारण्याची धमकी देत होते.

मंदार सुर्वे यांनी या त्रासाला कंटाळून शहर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात तक्रार दिली होती. या प्रकरणात निलेश किरला या यापुर्वी अटक करण्यात आलेली आहे. तर राजेंद्र इंदुलकरने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र
न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केल्याने बुधवारी (ता. १०) ला शहर पोलिसांनी इंदुलकर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांची प्रकृती ठिक नसल्याने न्यायालयीन कोठडी सुनावली.