रत्नागिरी:- रत्नागिरी शहरासह, तालुका आणि जिल्हाभरातील सावकारीचा विळखा बसलेला फास मोकळा करण्यासाठी पोलिसांनी सहाय्यक निंबधक कार्यालयाच्या सहकार्याने जोरदार मोहिम हाती घेतली आहे. सावकारीचा फासाने कर्जदारांना आवळणारा रत्नागिरीतील सावकार निलेश कीर चे कारनामे समोर आणले. आता त्याच्या या कारनाम्यांची व्याप्ती आणखीन समोर येणार आहे, कीर ने आणखीन तिघाजणांच्या जागा हडप केल्या असून लवकरच संबधित पिडीत तकारीसाठी समोर येणार आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून सावकारांकडून घेतलेल्या कर्जाखाली दबलेल्या अनेकांची मोठी कोंडी झाली होती. पण ती केंडी सावकार निलेश कीर यांच्या कारनाम्यांनी जनतेसमोर आली. कीर याचे कर्जदारांवरील जुलुम, त्यांची लुबाडणूकीची भांडाफोड पोलिसांत दिलेल्या तकारीवरून नोंद झाली. कीरसह अन्य सावकारांनी ज्या कर्जदारांच्या जागा हडप केल्या आहेत. त्याच्या व्यवहारांची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यापूर्वीच पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे.
रत्नागिरी शहर व तालुक्यातील सावकारांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ठोस पावले उचलली आहेत. सावकारीचा प्रचंड मोठ्या व्यावसाय करताना नागरिकांची पिळवणूक करणाऱया निलेश कीर याने ताब्यात घेतलेल्या 1 आयशर ट्रकसह 5 दुचाकी पोलीसांनी यापूर्वी या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जप्त केल्या आहेत. तर सावकारांच्या छळाला कंटाळून शहर सोडून गेलेल्या 5 जणांपैकी दोघां फिर्यादींसह तीन साक्षिदारांना पुन्हा मुळ घरी आणण्यात पोलीसांना यश आले आहे. तर निलेश कीरसह अन्य सावकरांनी ज्या कर्जदारांच्या जागा हडप केल्या आहेत. त्याच्या व्यावहाराची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आली आहे.
विनापरवाना सावकारीचा पहिला गुन्हा शहर पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर नोंदणीकृत सावकारांच्या छळाला कंटाळलेल्या कर्जदारांनी शहर पोलीस स्थानकात धाव घेतली. यासंदर्भात एकूण चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील मोठा सावकार असलेल्या निलेश कीर यांच्या कारनाम्याने पोलीसही हैराण झाले आहे. त्याने सुमारे शंभरहून अधिक गाड्या आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. त्यापैकी 1 आयशरसह पाच दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले. तर निलेश कीर याच्याकडील कर्जदारांच्या लिस्ट प्रमाणे पोलीस कर्जदारांना शोधत आहेत.
जादा व्याजदराने कर्ज वसूली करणाऱया निलेश कीर याने शहर व तालुक्यात मालमत्ता घेतल्या आहेत. त्याचा ताबाही पोलिसांमार्पत घेण्यात येउन त्या सिल केल्या जाणार आहेत. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरु करण्यात आला आहे. निलेश कीरसह अन्य नोंदणीकृत, बेकायदा सावकरांनी ज्या जागांचा ताबा आपल्याकडे घेतला आहे. त्या व्यवहारांची माहिती येथील सहाय्यक निबंधकांकडून पोलीसांनी मागविली आहे. दरम्यान कीर याने आणखीन तिघा कर्जदारांच्या जागा हडप केल्याची माहिती समोर आली आहे. संबधित पिडीत कर्जदार त्यासंदर्भात तकार करण्यासाठी पुढे येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.