रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्मालय-साळवी स्टॉप मार्गावर मोकाशी बिअर शॉपजवळ ब्राऊन हेरॉईन विक्री करण्यासाठी तयारीत असलेल्या आरमान लियाकत धामस्कर याला शहर पोलीसांनी अटक केली. त्याच्याकडून ६.०० ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन जप्त केले. याची किंमत सुमारे १ लाख रु. आहे. पोलीसांनी दुचाकीसह रोख रक्कम १ हजार २०० रु.जप्त करण्यात आले आहेत.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अंमलदार अमोल भोसले साळवी स्टॉप जवळ गस्त घालत असताना त्यांना मोकाशी बिअर शॉपी जवळ आरमान धामस्कर हा ६.०० ग्रॅम वजनाचा सुमारे १ लाख रु. किंमतीचे ब्राऊन हेरॉईन घेऊन उभा होता. यावेळी पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक दुचाकी, रोख १ हजार २०० रु.जप्त करण्यात आले. आरमान धामस्कर याच्या विरोधात एन.डी.सी.एस ॲक्ट कलम ८ (क), २२ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.