रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्पा नरसिम्मा गंडमल्ला (वय २७, रा. साळवीस्टॉप, रत्नागिरी) व संदिप यशवंत बंडबे (वय २९, रा. गवळीवाडा, रत्नागिरी. मुळ ः उपळे, ता. लांजा) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २६) रात्री साडेदहाच्या सुमारास साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळले. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.