साळवी स्टॉप- परटवणे रोडवर ट्रकची पादचाऱ्याला धडक, चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते परटवणे रोडवरून जाणाऱ्या पादचाऱ्याला ट्रकने धडक दिली. या अपघातात पादचारी जखमी झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दयाळ श्यामचरण पटेल असे जखमी पादचाऱ्याचे नाव आहे. तर बसवराज देवेंद्र मंटगी (२८, हिरुर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयाळ पटेल हे साळवी स्टॉप ते पटवणे रोडच्या डाव्या बाजूने चर्मालयाकडे चालले होते. यावेळी साळवीस्टॉपकडून परटवणेमार्गे मिरकरवाडाकडे जाणाऱ्या ट्रकने (जीए- ०७ एफ -७३६१) पाठीमागून धडक दिली. या धडकेत दयाळ पटेल हे जखमी झाले. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालक बसवराज मंटगी याच्यावर भावविकलम २७९, ३३७, ३३८ मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.