सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा ते निवळी या सार्वजनिक ठिकाणी कोरोना काळात स्वतःच्या तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई रविवार 20 जून रोजी सायंकाळी 5 ते 5.45 वा.सुमारास करण्यात आली.

तुकाराम विठ्ठल मालप (50,रा.निवळी, रत्नागिरी ) आणि अजय चंद्रकांत रावणंग (29,रा.निवळी रावणगवाडी, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असल्याचे माहित असतानाही सार्वजनिक ठिकाणी आपल्या तोंडाला मास्क न लावता हयगईचे कृत्य केले.अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.