रत्नागिरी:-मुंबई – गोवा महामार्गवरील निवळी आणि हाथखंबा या सार्वजनिक ठिकाणी कोरोना काळात तोंडाला मास्क न लावल्या प्रकरणी दोघांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी सकाळी 11 वा. करण्यात आली.
अरविंद तुकाराम मेस्त्री (40, रा.निवळी, रत्नागिरी ) आणि शिवाजी अंतू तारवे (50, रा.हातखंबा, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी कोरोना संसर्गात रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये असताना सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावता हयगईच कृत्य केल्याप्रकारणी ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.









