रत्नागिरी:- शहरानजीक मिरजोळे, मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी थर्टीफस्ट च्या पुर्वसंध्येला मद्य प्राशन करणाऱ्या पाच तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिमांशू कैलास गिरी (28, रा. अरिहंत पार्क, डायमंड नगर, रत्नागिरी), असिर सल्लाउद्दीन सोलकर (23, मिरकरवाडा, रत्नागिरी), तमिम अब्दुल्ला सोलकर (20, रा. नाणार इंगवाडी, ता. राजापूर), अब्दुल शफिक दर्वे (23, रा. कावळेवाडी, मिरकवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना शनिवारी (ता. 30) सायंकाळी सात ते आठ च्या सुमारास मिरजोळे, मांडवी येथे निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाचही संशयित तरुण सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस नाईक निखील माने, पोलिस हेड कॉन्स्टेबल आशिष भालेकर, अमोल भोसले, पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पडेलकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.