रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथील सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या प्रौढाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१० वाजता करण्यात आली .
रंजन रामचंद्र पालकर ( ५२ , रा . गोळप बौध्दवाडी , रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्रौढाचे नाव आहे . शुक्रवारी सायंकाळी रंजन पालकर हा गोळप बौद्धवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर देशी दारूची बाटली समोर ठेवून पिण्यासाठी बसलेला असताना ही कारवाई करण्यात आली . पोलिसांनी त्याची चौकशी केल्यावर त्याच्याकडे दारू पिण्याचा परवाना मिळून आला नाही . त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .